Tuesday, February 5, 2008

पहिलं वहिलं

का लिहितियेस?...(असंच, आपलं वाटलं लिहावंस म्हणून...किंवा असं म्हणेन की वहीची पानं अबोल वाटू लागली आहेत म्हणून)

काय लिहितियेस?...(काय?...तसं रोजचंच काही-बाही, ते वहीला खरंतर माहीत असायचं पण आता interactive element आल्यामुळे पुन्हा तशी नव्यानंच सुरुवात केल्यासारखं आहे)

कुणासाठी?...(माझ्यासाठी, अर्थातच. पण ह्यापलीकडे "कार्टे तुझी वही हातातून हिसकावून घेऊन वाचण्याचा कंटाळा आलाय, ब्लॉग छापा म्हणजे बाकीचे हजार लोक शिव्या घालतील तुला." असं म्हणणाऱ्या काही चांडाळ मित्रांसाठी. आता ह्यापलीकडे जाऊन त्या सगळ्यांसाठी जे कदाचित वाचतील आणि मित्रही होतील?)

कधी लिहिणारेस?...(कधीही वेळ मिळेल तेव्हा, आळस झटकावासा वाटेल तेव्हा आणि विमानातला जेट लॅग टाळावासा वाटणार नाही तेव्हा)

3 comments:

Yashodhara said...

लिही... :)
मराठी जालनिशीच्या विश्वात स्वागत :)

Iravatee said...

यशोधरा, मनापासून आभार. तुझा ’संवाद’आगदी ख्रराखुरा 'dialog' आहे. निवांत वाचन होईलचं, पण पहिला 'glance' एकदम मस्त!

Yashodhara said...

इरावती, तुझेही मनापासून आभार :)